लोकल न्यूज़

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार मदतीची मागणी – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन

धरणगाव (प्रतिनिधी) – रवींद्र निकम

धरणगाव तालुक्यासह शहरात १५ व १६ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे, घरांचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा त्वरित करून बाधितांना मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.

शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, व्यापारी सेना, महिला आघाडी तसेच शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने धरणगाव तहसील कार्यालय व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रत्येक शेतकऱ्याला एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

या वेळी शिवसेनेचे उपनेते मा. गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख मा. निलेश भाऊ चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

धरणगाव येथे निवेदन देताना जानकीराम पाटील, जयदीप पाटील, राजेंद्र ठाकरे, निलेश चौधरी, विजय पाटील, उमेश महाजन, भागवत चौधरी, हेमंत महाजन, परमेश्वर महाजन, अरुण पाटील, सचिन पाटील, राहुल रोकडे, राजेंद्र चौधरी, सोपान महाजन, जितेंद्र धनगर, किशोर माळी, रविंद्र वाघ, स्वप्निल परदेशी, गजानन महाजन, माधव पाटील, भरत पाटील, संदीप पाटील, लखिचंद पाटील, भिकन पाटील, साकरे आदींसह गंगापुरी, जाभोरा, धरणगाव, पष्टाणे, रोटवद, साळवा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील यांनी शेतकऱ्यांच्या ऐक्याचे कौतुक करत उपस्थितांचे आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!