लोकल न्यूज़

सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात स्व मेजर ध्यानचंद सिंह यांची जयंती साजरी

प्रतिनिधी – विकास चव्हाण

धरणगाव- येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात 29 ऑगस्ट रोजी जागतिक कीर्तीचे हॉकीपटू स्व मेजर ध्यानचंद सिंह यांची जयंती साजरी करून राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा ललितजी उपासनी , मार्गदर्शक प्रा रमेश महाजन ,तसेच मुख्याध्यापक एस एस पाटील, मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच सांस्कृतिक समितीचे प्रमुख वाय पी पाटील यांनी स्व मेजर ध्यानचंद सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले .प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मैदानी स्पर्धेत जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते कौतुक करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेचे सचिव ललितजी उपासनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी पी रोकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील क्रीडाशिक्षक एस एल सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!