धर्मलोकल न्यूज़

पाळधी गावात भक्तीमय वातावरणात कापुरे कुटुंबाकडून गणरायाला तीन दिवसीय अखंड टाळसेवेचा निरोप.

भक्तिरसात रंगलेला कापुरे कुटुंबाचा गणरायाला तीन दिवसांचा निरोप

पाळधी (प्रतिनिधी) :धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात श्री सुभाष श्रीकांत कापुरे (आप्पा) व सौ. वंदना सुभाष कापुरे यांच्या कुटुंबात पंचवार्षिक परंपरेप्रमाणे गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या गणरायाचे वैशिष्ट्य म्हणजे कापुरे परिवारातील सदस्य रात्रंदिवस सलग तीन दिवस अखंड टाळ वादनाची सेवा करतात. या अखंड टाळ वादनामुळे घर व परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून जातो.

गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी पाळधी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तींसह सर्वच क्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यावर्षी विशेषतः एपीआय प्रशांत कंडारे, पीएसआय बडगुजर साहेब, पो. कॉं. विठ्ठल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील तसेच पाळधी येथील उद्योगपती दिलीप (बापू) पाटील यांनी उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. तसेच गावातील भजनी मंडळ देखील येथे उपस्थित राहून भजनसेवा देतात. या सेवेमुळे लहान मुलांवरही संस्कार होऊन त्यांच्यात भक्तिभाव वाढीस लागतो.

या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भक्ताचे श्रीफळ, टोपी आणि रुमाल देऊन सत्कार करण्यात येतो. कापुरे कुटुंबियांच्या घरच्या गणपतीवर भक्तांचा विशेष विश्वास असून, “या गणरायाला नवस केल्यास तो पूर्ण होतो” असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. त्यामुळे या गणपतीला ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ओळखले जाते.

श्री गणेशाचे नामस्मरण, टाळ-कीर्तन व भजन, तसेच भक्तीमय वातावरणात तीन दिवस अखंड सेवा देत उत्सवाची सांगता पारंपारिक पद्धतीने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!