लोकल न्यूज़

महात्मा फुले हायस्कूल येथे पालक – शिक्षक सभा उत्साहात संपन्न.

पालक - शिक्षक संघ व माता - पालक संघ यांची कार्यकारणी जाहीर !... धरणगाव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा

धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळ महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे पालक – शिक्षक सभा व माता – पालक शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली. सर्वप्रथम शैक्षणिक वर्ष २०२५- २६ साठी पालक शिक्षक व माता पालक – शिक्षक संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

पालक शिक्षक सभेच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, उपाध्यक्षपदी अनिल तापीराम भोई व सचिवपदी पालक शिक्षक संघाचे प्रमुख पी डी पाटील व प्रत्येक वर्गातील २ पालक असे १२ सभासद तसेच माता – पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सुरेखा करोसिया, सचिवपदी एम के कापडणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पालक शिक्षक संघाचे समिती प्रमुख एच डी माळी यांनी पालक शिक्षक संघाची उद्दिष्टे, शालेय शिस्त, शिष्यवृत्ती, क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा विषयी विस्तृत माहिती सांगितली. स्वातंत्र्यदिन आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेच्या प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य कंपास पेटी, चित्रकला वही व पेन देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षक व पालक या दोघांचा वाटा आहे. आपण दोघं मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करूया असे प्रतिपादन केले. पालक शिक्षक सभेला महाग्या बारेला, अनिल भोई, विकी चंडाले, मनोज सोनवणे, नितीन चंडाले, रवी करोसिया, अल्का भोई, सुरेखा करोसिया, भारती चंडाले, अकिलशहा फकीर, उषा कुंभार, पुरुषोत्तम जाधव, उरमल मोरे, निर्मला पवार, सुलोचना करोसिया, राकेश महाजन, मनीषा बारेला, बापु भिल शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या सहविचार सभेचे सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार एस एन कोळी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!