लोकल न्यूज़

इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळातर्फे उत्साहात गणेशाचे स्वागत.

पाळधी (दि. 27 ऑगस्ट 2025) – इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे इम्पिरियल विद्यार्थी गणेश मंडळाच्या वतीने आज गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच शाळा परिसरात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शाळेचे चेअरमन श्री. नरेशजी चौधरी, कार्यकारी संचालक श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य श्री. विवेक रुपनर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले.

गणेश मंडळ स्थापन करण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांमध्ये टीम वर्कची जाणीव निर्माण करणे, बाजारातील माहिती, खरेदी कौशल्य तसेच मंडळाचा हिशोब ठेवणे अशा विविध बाबींविषयी प्रत्यक्ष अनुभव देणे हा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.

गणेश स्थापनेनंतर सर्व विद्यार्थ्यांना मोदकाचा प्रसाद वाटण्यात आला. शाळा परिसरात “गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!