लोकल न्यूज़

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

पाळधी प्रतिनिधी- दि.15 ऑगस्ट, 2025 रोजी, पाळधी तालुका धरणगाव येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज देशाचा 79 वा “स्वातंत्र्य दिन” मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. श्री.धनंजय बेंद्रे आणि डॉ.सौ. सुनिती बेंद्रे (बेंद्रे हॉस्पिटल, जळगाव )डॉ. श्री. पवन कुमार बजाज (बजाज मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक जळगाव) डॉ. श्री.राजेंद्र पायघन आणि डॉ. सौ.दीप्ती पायघन (पायघन हॉस्पिटल) जळगाव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रसंगी शाळेचे चेअरमन श्री. नरेशजी चौधरी, संचालिका सौ. शोभा चौधरी, कार्यकारी संचालक श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य श्री विवेक रुपनर आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सर्वांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शानदार अश्या परेड ने करण्यात आली, प्रसंगी गायन, भाषण, नृत्य, तसेच शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील उत्कृष्ठ असे नाट्य सादर करण्यात आले. यासंह विविध कला देखील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्री प्रायमरी व प्रायमरी वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले वेगवेगळ्या वेशभूषेतील स्वातंत्र्यसैनिक. प्रसंगी डॉ. सौ. दीप्ती पायघन यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्यास सांगून ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे, याचे महत्त्व सांगितले. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी साधला. शाळेचे चेअरमन इंजि. श्री. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विविध स्पर्धा परीक्षांना असेच सामोरे जात राहा, यश तुमचेच आहे. आणि सर्वात शेवटी आभार प्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.9 वी चे विद्यार्थी वेदश्री वाघ आणि आदित्य माने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!