क्राइमधर्ममहाराष्ट्रलोकल न्यूज़

धरणगावातील श्री सार्जेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी

ऐतिहासिक प्रार्थना स्थळ प्रसिद्ध असलेले श्री सारजेश्वर महादेव मंदिर

धरणगावातील ऐतिहासिक श्री सार्जेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

ही घटना फक्त आर्थिक नुकसानीपुरती मर्यादित नसून भाविकांच्या श्रद्धा आणि भावनांवर केलेला गंभीर घाव असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

नागरिकांनी पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करून आरोपींना गजाआड करण्याची मागणी केली असून, पुढील काळात मंदिर व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!