लोकल न्यूज़

धानोरे येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – लक्षण महाजन

धानोरे (ता. धरणगाव) येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धमान दिनानिमित्त श्री श्री महामंडलेश्वर 1008 ह.भ.प. गुरुवर्य भगवान बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये महंत श्री. अशोकदास महाराज शिरपूरकर यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले. यावेळी धानोरे गावाचे सरपंच, माजी सरपंच श्री. भगवान महाजन, आणोरा येथील माजी सरपंच श्री. रमेश खंडू महाजन, श्री. आर.एन. महाजन सर, कै. बी.जे. महाजन, आनोरा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम.एच. चौधरी सर तसेच पंचक्रोशीतील पष्टाने, तरटे, सोनवद, गंगापुरी, गारखेडा, बाभळे, आनोरे आणि धानोरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सावता महाराज मंदिराचा तिसरा वर्धापन दिन कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!