देश

दादर-भुसावल स्पेशल एक्सप्रेसला मुदतवाढ; प्रवाशांचा आनंद

खान्देश प्रवासी असोसिएशनच्या मागणीला यश, खासदार स्मिताताई वाघ यांचे प्रयत्नांना यश.

खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वेकडून 09051/52 दादर-भुसावल स्पेशल एक्सप्रेस (सोमवार, बुधवार, शनिवार) ही गाडी 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, 09049/50 दादर-भुसावल स्पेशल एक्सप्रेस (दर शुक्रवार) ही गाडी 26 डिसेंबर 2025 पर्यंत धावणार आहे.

या निर्णयामुळे मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त जाणाऱ्या खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणगाव व अमळनेर स्थानकांवरून सायं. 6.50 व 7.20 वाजता गाड्या उपलब्ध असून, प्रवाशांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

खान्देश प्रवासी असोसिएशनने नवनिर्वाचित खासदार मा. स्मिताताई वाघ यांच्याकडे या गाड्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात किंवा किमान मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार असोसिएशनने पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर व डीआरएम, मुंबई यांना निवेदन दिले होते.

सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे, प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या मुंबई सेंट्रल-भुसावल एक्सप्रेसला खान्देशातील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे ही सुविधा पुढे वाढवण्यात आली आहे.

खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ऍड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन व सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, संभाजी सोनवणे, नारायण महाजन, जतिन नगारीया आदींनी खासदार स्मिताताई वाघ, तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

असोसिएशनतर्फे खान्देशातील सर्व प्रवाशांना या गाड्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!