टेक्नोलॉजीलोकल न्यूज़

भुसावळमध्ये ‘बहिणाबाई मार्ट’ चे भूमिपूजन — महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल

भुसावळ | दिनांक 9 ऑगस्ट 2025 — भुसावळ शहरात जिल्हा विकास आराखडा निधी अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटांच्या व्यवसायिक विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘बहिणाबाई मार्ट’ चे भूमिपूजन आज मा. मंत्री श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडले.  

या वेळी मंत्री महोदयांनी महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरणा देत, “स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी या मार्टचा जास्तीत जास्त उपयोग करावा” असे आवाहन केले.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनल करणवाल यांनी महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन करत, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमातील ठळक मुद्दे

प्रास्ताविक : श्री. राजेश लोखंडे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

आभारप्रदर्शन : डॉ. सचिन पानझाडे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भुसावळ

विशेष उपस्थिती : श्री. हरेश्वर भोई, जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद अभियान

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विनोद पाटील (तालुका अभियान व्यवस्थापक), राहुल ठोसरे (तालुका व्यवस्थापक), प्रिया वाडेकर, प्रियंका पाटील, प्रियंका तायडे, आकाश लोखंडे, राजू नाकतोडे यांसह पंचायत समिती व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी तसेच गावातील समुदाय संसाधन व्यक्तींनी परिश्रम घेतले.

‘बहिणाबाई मार्ट’ हा उपक्रम महिला आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सक्षमीकरण आणि स्थानिक उत्पादने बाजारपेठेत आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!