महाराष्ट्रलोकल न्यूज़

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात ध्वजारोहण, वर्धापन दिन व बालकवींचा जन्मदिन उत्साहात.

प्रतिनिधी/ विकास चव्हाण

धरणगाव – श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात आज ध्वजारोहण, वर्धापन दिन आणि निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव मा. ललीतजी उपासनी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मा. चिंतामण पाटील, मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारतमाता व बालकवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सकाळच्या सत्रात श्रीमती वर्षा पाटील यांनी बालकवींची माहिती व कविता सादर केल्या. दुपारच्या सत्रात श्रीमती जयश्री बोरसे यांनी बालकवी ठोंबरे यांच्या जीवन व निसर्गकाव्याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी निसर्गकाव्य गायन स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अखेरीस मा. ललीतजी उपासनी व मा. चिंतामण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वाय. पी. पाटील व सरोज तारे यांनी केले तर आभारप्रदर्शन एस. एस. देसले यांनी केले. सांस्कृतिक समिती प्रमुख वाय. पी. पाटील, समिती सदस्य व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!