लोकल न्यूज़

बालकवी ठोंबरे सारजाई कुडे विद्यालयातील लिपिक श्री शिरीषकुमार बयस सेवानिवृत्त

प्रतिनिधी – विकास चव्हाण

धरणगाव- येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित काकासाहेब दामोदर कुडे बालक मंदिर ,बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील लिपिक आप्पासाहेब श्री शिरीषसिंह घनश्यामसिंह बयस हे नियत वयोमानानुसार २९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी त्यांना निरोप देण्यासाठी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा हेमलाशेठ भाटिया, संस्थेचे सचिव ललितजी उपासनी, संस्थेचे उपाध्यक्ष मा चिंतामण पाटील,संस्थेचे मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा रमेश महाजन संस्थेचे संचालक श्री शांताराम दामू महाजन ,सौ.शोभाताई बाळासाहेब चौधरी, सुशीलभाई गुजराथी,
प्रदीप केशव मालपुरे ,श्री ऍड.राजेंद्र एकनाथ येवले,श्री ज्ञानेश्वरभाऊ भामरे श्री यशवंत कुलकर्णी,
मा.प्रदीप बराटे , मा.मोहन रावतोळे साहेब ,
मा. प्रा हेमंत अंकुश पाटील ऍड. राहुल पारेख ,श्री मनोहर बडगुजर तसेच आजीव सभासद काकासाहेब ध्रुवसिंग बयस, मा.रामनाथ चिंधु पाटील, मा.प्रविणभाऊ कुडे, तसेच राजपूत समाजाचे अध्यक्ष उद्योगपती मा जीवनसिह बयस,सतिषसिह जनकवार उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्या वतीने सत्कारार्थी श्री शिरीषसिंह घनश्यामसिंह बयस तसेच त्यांच्या सौभाग्यवती मनीषा शिरीषसिह बयस यांचा ड्रेस,साडी व शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व स्टाफच्या वतीने मुख्याध्यापक श्री व्ही बी पाटील,मुख्याध्यापक श्री एस एस पाटील, बालक मंदिरच्या प्रमुख मीनाक्षी वारुळे,जेष्ठ शिक्षक श्री किशोर चौधरी,श्री डी आर चव्हाण,श्री महेश आहेराव श्री के जे पवार,सौ वर्षा पाटील यांनी सुबक अशी गोमातेची मूर्ती शाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेट दिली. नातेवाईक, आप्तेष्ट, व्याही मंडळी,जावई मुली , पक्ष्याचे पदाधिकारी यांनी सत्कार केला.सुरुवातीला मुख्याध्यापक श्री व्ही बी पाटील सर यांनी प्रास्ताविक, परिचय व मनोगतातून श्री शिरीष बयस यांच्या कार्याबद्दल व त्यांच्या शाळेच्या हिताबद्दलच्या तसेच वैयक्तिक त्यांच्या कुटुंबाच्या सुख दुःखात सहभागी होऊन मोठ्या भाऊसारखे सहकार्य केल्याच्या आठवणी सांगितल्या.तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री हेमलालशेठ भाटिया, सचिव ललीतजी उपासनी,उपाध्यक्ष चिंतामण पाटील,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री एस एस पाटील, श्री विलास महाजन सर,श्री किशोर चौधरी,श्री महेश आहेराव,श्री नारायण वाणी,प्रियंका गजरे यांनीही आपल्या मनोगतातून आठवणी कथित केल्या. संस्थेच्या पायाभरणीपासून आतापर्यंतच्या उभारणीस आप्पाचा खूप मोठा वाटा आहे असे मतं मांडलीत व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. तसेच सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेऊन सर्वांच्या सुख दुःखात धावून आलेत.आप्पाचा सौभाग्यवती मनीषा बयस ह्या मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,संस्थेने आम्हा परिवाराला खूप प्रेम दिलं.यानंतरही असेच प्रेम द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली.निरोपाला उत्तर देतांना श्री शिरीष बयस यांना गहिवरून आले.संस्थेने व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी सहकारी यांनी मला खूप प्रेम दिले, ते मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.मनोगतानंतर निरोपार्थी श्री शिरीष बयस यांनी संस्थेच्या व विद्यार्थी हिताच्या उपक्रमासाठी एक्कावन्न हजार रुपये देण्याचे जाहीर केले.अध्यक्षीय मनोगतात प्रा रमेश महाजन यांनी म्हटले की,सुरवातीपासून संस्थेच्या उभारणीस तसेच कोणतेही वरिष्ठ लेव्हलचे काम असेल तर शिरीष आप्पा जातीने लक्ष घालून ते काम पूर्ण करीत तसेच शाळेच्या बांधकामात रात्रपहाट करून ते काम पूर्ण केले.असेच प्रेम संस्थेच्या प्रति असू द्यावे आणि उर्वरीत आयुष्य परिवारासोबत त्यांना वेळ देत आयुष्याचा आनंद घेण्याच्या शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमानंतर आप्पाकडून मिळालेल्या सुरुची भोजनाचा आनंद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाय पी पाटील यांनी तर आभार श्री सागर पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!