लोकल न्यूज़

ऋषीपंचमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

प्रतिनिधी – रवींद्र निकम

धरणगाव दिनांक 28 ऑगस्ट 2025, गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता ऋषीपंचमीच्या पवित्र पर्वानिमित्त समस्त माळी समाज पंच मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची स्थापना करण्यात आली. या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माळी, कुणबी पाटील, तिळवण तेली व मराठा समाजाचे पंच मंडळ तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कीर्तन सप्ताहाच्या या सुरुवातीला धार्मिक वातावरणात गजर झाला असून पुढील सात दिवस विविध कीर्तन, प्रवचन व हरिनामाचा महोत्सव समाजासाठी खुला राहणार आहे. या कार्यक्रमामुळे समाजात भक्तीभावना वृद्धिंगत होऊन ऐक्य व बंधुता दृढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास पंच मंडळाने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!